कथित वायरल व्हिडियो प्रकरणात कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांना राष्ट्रवादी पक्षाकडून अभय मिळाले आहे. राज्यात नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण जोरदार सुरु असताना मंत्री नरहरी झिरवळ यांच्या देखील अडचणीत वाढ झाली. खरात प्रकरण सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. नरहरी झिरवाळ यांच्या शासकीय निवासस्थानावरील हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरून होती.
यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर चर्चा करून त्यांच्याविरोधात बदनामीचा कट रचल्याचे सांगितले तसेच त्यांच्याविरोधात कट रचणाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केली आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सुद्धा फोन करून मंत्री नरहरी झिरवळ यांनी कथित वायरल वीडियो प्रकरणात स्वतःची बाजू मांडली असल्याची माहिती आहे.
हेही वाचा- Ladki Bahin Yojna: “येत्या 2-3 दिवसांत…” लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरे यांची मोठी घोषणा
तसेच यासंदर्भात राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांकडून याप्रकरणावर थेट भूमिका घेण्यात आली आहे. यावेळी मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावरचे आरोप सिध्द झाल्यावरच कारवाई होणार फक्त कोणीतरी आरोप केले म्हणून पक्ष कारवाई करणार नाही असं राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं आहे. यावेळी केवळ आरोप झाले म्हणून राजीनामा घेणार नसल्याचं पक्षाची भूमिका असल्याने सध्या तरी मंत्री नरहरी झिरवळ यांना पक्षाकडून अभय मिळाले असल्याचे माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
नरहरी झिरवाळ यांच्या शासकीय निवासस्थान येथून त्यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत नरहरी झिरवाळ आणि त्यांच्यासोबत दोन व्यक्ती आहेत. हा व्हिडीओ नेमका कोणी समोर आणला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या व्हिडीओमुळे नरहरी झिरवाळ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर उगाच त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांचा हा व्हिडिओ व्हारल केला जात असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.