Congress Vs BJP : ‘मुंबई पोलिसांना बदनाम करू नका’, नवनाथ बन यांच्या आरोपावर वर्षा गायकवाड यांचं सडेतोड उत्तर; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Congress Vs BJP : ‘मुंबई पोलिसांना बदनाम करू नका’, नवनाथ बन यांच्या आरोपावर वर्षा गायकवाड यांचं सडेतोड उत्तर; भाजप-काँग्रेस आमनेसामने

मुंबई : दिल्लीसह देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबईतही अनेक भागांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलने केली असून पोलिसांनी ती थांबवण्याचा प्रयत्न केला. अशातच दादर येथील एका आंदोलनात पोलिसाने धरपकड करताना गर्दीतील एका मुलीला चुकीच्या पद्धतीने पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओने सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही खळबळ माजवली. पोलिसाच्या त्या व्हिडीओवर मुंबई पोलिसांकडून आधी स्पष्टीकरणाची पोस्ट जारी करण्यात आली. मात्र काही तासांनंतर ती पोस्ट डिलीट केली गेली. याच मुद्द्यावर जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलने भाजपचे मुंबईतील नगरसेवक आणि प्रवक्ता नवनाथ बन तसेच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्याशी संवाध साधला. यावेळी बन यांनी पोलिसांची बाजू धरून लावली असून उगाच मुंबई पोलिसांना बदनाम करू नका, असे म्हटले. तर खासदार गायकवाड यांनीही महिलांचा आदर करा, असा टोला यावेळी लगावला. त्यांच्यातील शाब्दिक चकमक व्हिडीओमध्ये पाहता येईल.

हेही वाचा : Raj Thackeray on Protest Lathicharge: दिल्ली विद्यार्थी आंदोलनावर राज ठाकरे आक्रमक; ‘पोलिसांना आदेश कोणी दिले?’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version