CJP Strategy Meeting : आर्थिक संकट, E20 इंधन, बेरोजगारी, आंदोलन…; CJP ची विविध मुद्द्यावंर चर्चा, दीपकेंच्या घरी दोन दिवसीय बैठकीला सुरूवात

CJP Strategy Meeting : आर्थिक संकट, E20 इंधन, बेरोजगारी, आंदोलन…; CJP ची विविध मुद्द्यावंर चर्चा, दीपकेंच्या घरी दोन दिवसीय बैठकीला सुरूवात

छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोज जनता पार्टीचे पुढील ध्येयधोरण ठरवण्यासाठी आज, बुधवारपासून दोन दिवसीय बैठकीला सुरूवात झाली आहे. ही बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दीपके यांच्या घरी होती आहे. या बैठकीत सध्या एकूण १३ सदस्य उपस्थित असून यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे बैठकीपूर्वी अभिजीत दीपकेंनी सांगितले. अभिजीत म्हणाले की, आम्हाला देशभरातून समर्थन मिळालं आहे. त्यामुळे आमचे संघटन संपूर्ण देशभरात कसे वाढवले जाईल, पुढे कुठले पाऊल उचलले पाहिजे यावर बैठकीत चर्चा होईल. दोन दिवसीय आमचा कॉक्रोज इन्कलेव्ह होत आहे. त्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल. झारखंड येथील विद्यार्थांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. तिथे जाऊन त्यांची भेट घेणार आहोत. देशभरात आमच्या आंदोलनाला यश मिळत होतं. आज राजकीय पार्टीची परिस्थिती खूप वाईट आहे. एका पक्षातून निवडून येतेय नंतर दुसऱ्या पार्टीत दिसते. ईडी, सीबीआयचा वापर करून पक्ष फोडले जात आहेत.

या विषयावर बैठकीत होणार चर्चा

– देशातील संस्थांमधील उडत चाललेला विश्वास
– E 20 मुद्दा
– आर्थिक संकट.
– बेरोजगारी

हेही वाचा : BMC Mayor Bungalow : महापौर बंगल्याचं नुतनीकरण झालेलं असतानाही पुन्हा खर्च का? आदित्य ठाकरेंनी सुनावले; महापौरांनीही दिले स्पष्टीकरण

दरम्यान बैठकीला उपस्थित सीजेपीचे प्रवक्ता सौरभ दास यांनीदेखील माहिती देताना सांगितले की, ज्यांच्यावर लाट्याकाठ्या चालवल्या गेल्या, पॅलेट गन चालवल्या. या पोलिसांनी केलंय त्या पोलिसांबाबत आपण काय करतोय. जे जखमी झाले आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पहिल्या दिवसापासून मदत देत आहोत. त्यामध्ये लीगल मेडिकल अशी  सर्व मदत आम्ही त्या विद्यार्थ्यांना पोहोचवत आहोत. फक्त दिल्लीमध्येच नाही तर देशातल्या ज्या ज्या राज्यांमध्ये आंदोलन झालेले आहेत. त्या सर्व राज्यातील आंदोलकांसाठी आम्ही मुद्दा उचलत आहोत. सरकारसोबत आमची चर्चा सुरू आहे. सरकारच्या प्रतिनिधींसोबत आमची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक एफआयआर विड्रॉल करण्यात आली आहेत. अजून थोडाफार प्रोसेस बाकी राहिला आहे. आम्ही सर्वजण आमचं काम करत होतो, ती परिस्थिती हाताळत होतो. जंतरमंतरवर जेव्हा चलो संसद आंदोलन झालं, त्यावेळेस संपूर्ण परिसरात बॅरिकेटिंग करण्यात आली होती. बाहेर काही ग्रुप अजून होते. आमची सरकारसोबत त्या दिवशी चर्चा सुरू होती. जी लहान मुली होत्या त्यांच्या विरोधात डॉक्सिंग कॅम्पेन चालवलं गेलं. भाजप आणि आरएसएसच्या समर्थनार्थ जे लोक होते त्यांनी हा सर्व कॅम्पेन चालवलं होतं. सोनम वांगचोक हे आमचे मेंटाॅर आहेत. आम्ही त्यांच्याशी सल्ला नेहमी घेत असतो, ते पुढेही आमचे मेंटाॅर राहतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version