BMC News : मुंबई महापालिकेबाबत माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड; नगरसेवकांच्या निवडीला कोर्टात आव्हान, नेमकं प्रकरण काय?

मुंबई महापालिका निवडणूक 2026 वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
BMC News : मुंबई महापालिकेबाबत माहिती अधिकारात धक्कादायक माहिती उघड; नगरसेवकांच्या निवडीला कोर्टात आव्हान, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक 2026 वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निवडून आलेल्या तब्बल 79 नगरसेवकांच्या निवडीविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. माहिती अधिकारातून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. अनेक निवडणूक याचिका न्यायप्रविष्ट, तर एका प्रकरणात याचिका फेटाळली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. गलगली यांनी निवडणुकीनंतर विविध प्रभागांमध्ये दाखल झालेल्या निवडणूक याचिकांची माहिती मागवली होती. त्यानंतर पालिकेच्या विधी खात्याने अधिकृत माहिती उपलब्ध करून दिली.

हेही वाचा : Gold Silver Rate Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या मुंबई, पुणे आणि दिल्लीतील आजचे ताजे दर

माहिती अधिकार कायद्यान्वये आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना ही माहिती मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याकडून देण्यात आली आहे. गलगली यांनी निवडणुकीनंतर विविध प्रभागांमध्ये दाखल झालेल्या निवडणूक याचिकांची माहिती मागवली होती. त्यानंतर पालिकेच्या विधी खात्याने अधिकृत माहिती उपलब्ध करून दिली. उपलब्ध माहितीनुसार, प्रभाग 119 ‘एस’ मधील मोहम्मद अन्वर अब्दुल्ला शेख यांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेश सोनावळे आणि इतर उमेदवारांविरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका लघुन्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र उर्वरित अनेक प्रकरणांमध्ये अद्याप सुनावणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1, समाजवादी पार्टीला 2 जागा जिंकल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version