Sara Tendulkar At Kashi Vishwanath Temple : आई अंजलीसोबत सारा तेंडुलकरने घेतले काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन
माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांनी सोमवारी दुपारी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. मंदिराची भव्यता, विस्तीर्ण कॉरिडोर पाहून मायलेकींच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
Sara Tendulkar At Kashi Vishwanath Temple : आई अंजलीसोबत सारा तेंडुलकरने घेतले काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन
माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांनी सोमवारी दुपारी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. मंदिराची भव्यता, विस्तीर्ण कॉरिडोर पाहून मायलेकींच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता
मंदिराचे मुख्य अधिकारी विश्वभूषण मिश्रा यांनी अंजली आणि साराचे औपचारिक स्वागत करून त्यांना रुद्राक्षमाला, शाल आणि स्मृतिचिन्हे दिली
मंदिराचे मुख्य पुजारी पंडित श्रीकांत शर्मा यांनी अंजली आणि सारा तेंडुलकर यांच्या कपाळावर टिळा लावला आणि मायलेकींनी विधीवत काशी विश्वनाथांची पूजा-अर्चा केली
यावेळी अंजली तेंडुलकरांनी आकर्षक काळ्या रंगाचा कुर्ता तर साराने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या छटांची देखणी कुर्ती परिधान केली होती
साराचा निरागस आणि मोहक अंदाज तसेच तिचा पारंपरिक लूक पाहून चाहत्यांनी तिचे मनापासून कौतुक केले