Sushmita Sen Birthday : मिस युनिव्हर्स 1994 अवॉर्ड गोज टू…सुष्मिता सेनला विचारलेला तो प्रश्न ठरला गेमचेंजर

अभिनेत्री सुष्मिता सेनचा वाढदिवस 19 नोव्हेंबरला असतो. 1994 मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. 1994 मध्ये मिस इंडियासोबतच मिस युनिव्हर्सचा किताबही तिच्या नावावर झाला. विशेष म्हणजे, अवघ्या 18व्या वर्षी सुष्मिता विश्वसुंदरी ठरली
Sushmita Sen Birthday : मिस युनिव्हर्स 1994 अवॉर्ड गोज टू...सुष्मिता सेनला विचारलेला तो प्रश्न ठरला गेमचेंजर
1 / 8
अभिनेत्री सुष्मिता सेनचा वाढदिवस 19 नोव्हेंबरला असतो. 1994 मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. 1994 मध्ये मिस इंडियासोबतच मिस युनिव्हर्सचा किताबही तिच्या नावावर झाला. विशेष म्हणजे, अवघ्या 18व्या वर्षी सुष्मिता विश्वसुंदरी ठरली
2 / 8
सुष्मिताने 1994 मध्ये फेमिना मिस इंडियासह मिस युनिव्हर्सचा किताब देखील मिळवला. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. पण तुम्हाला माहीत आहे का? सुष्मिताचा मिस इंडियाचा प्रवास खूप खडतर होता. या स्पर्धेत तिच्यासोबत ऐश्वर्या रायसुद्धा होती
3 / 8
दोघींची सौंदर्य आणि आत्मविश्वासाची स्पर्धा होती, ज्यामुळे प्रेक्षकांसह परीक्षकांनाही प्रश्न पडला की या स्पर्धेत कोण विजयी ठरणार? मिस इंडियाच्या स्पर्धेत दोघींना एकच गुण मिळाले, ज्यामुळे सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांच्यात काॅंटे की टक्कर होती
4 / 8
अखेर परीक्षकांनी दोघींना वेगवेगळे प्रश्न विचारण्याचे ठरवले. जेणेकरून दोघींपैकी कोण मिस इंडियाचा किताब स्वत:च्या नावे करतील, हे ठरवणे आणखी सोपे होईल
5 / 8
आता सर्वांची नजर सुष्मिताच्या उत्तरावर होती. परीक्षकाने सुष्मिताला प्रश्न विचारले की, तुला भारताच्या वस्त्र परंपरेच्या वारसाबद्दल कोणकोणत्या गोष्टी माहिती आहे? हा प्रश्न तिच्या ज्ञानाला तेज देणारा ठरला. सुष्मिता आत्मविश्वासाने उत्तर देण्यासाठी सज्ज झाली
6 / 8
सुष्मिताने भारतीय कापड संस्कृती महात्मा गांधींच्या काळापासून सांगितली. सोबतच, तिने कापड परंपरेच्या दीर्घ इतिहासाचा सुंदर उल्लेख केला. ती म्हणाली, मला भारतीय आणि पारंपारिक वस्त्रांची आवड आहे. माझ्या वॉर्डरोबमध्ये भारतीय वस्त्रांना विशेष स्थान आहे
7 / 8
तिने भारतीय परंपरेशी स्वतःची नाळ जोडली. साहजिकच, तिच्या उत्तरात तिचे भारताप्रती प्रेम आणि सन्मान सहजपणे झळकले. सुष्मिताने दिलेल्या उत्तरामुळे ती ऐश्वर्यापेक्षा सरस ठरली. या प्रश्नानेच मिस इंडियाचा मुकुट तिच्या नावावर आला
8 / 8
Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version