‘कल्याण डोंबिवली मनपाच्या प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने होत आहेत’ – प्रकाश भोईर

‘कल्याण डोंबिवली मनपाच्या प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने होत आहेत’ – प्रकाश भोईर

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नव्याने होत असलेली प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष व माजी विरोधी पक्ष नेते केडीएमसी प्रकाश भोईर यांनी केला आहे.

मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष माजी विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आयुक्त, मुंबई यांच्याकडे एका पत्रकाद्वारे तक्रार केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रतिनिधींचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२०ला समाप्त झाल्यानंतर कोरोना काळात निवडणुका लांबणीवर गेल्या, आता प्रभाग रचना करताना काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून प्रभाग रचनेच्या कामात काही राजकीय पक्षाचे ठराविक पदाधिकारी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताना दिसत  आहेत.

त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेबाबत लक्ष घालावे याकरिता तक्रारवजा अर्ज दाखल करून कल्याण डोंबिवली आयुक्त, सचिव यांना ही याची प्रत त्यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version