वसईत महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक करण्यात आली. यावेळी जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेमध्ये ३ कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
भूमाफियांकडून महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकांवर दगडफेक झाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वसई पूर्वेकडील केळीचा पाडा येथील पालनगरमध्ये प्रभाग जीचे सहाय्यक आयुक्त सुभाष जाधव हे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेले असता जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या. या पूर्वीसुद्धा भूमाफियांनी पालिकेच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक करून गाड्यांची जाळपोळदेखील केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.