Marathon Meetings for Mahayuti Formula : महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्मूला ठरला; शिंदे – चव्हाणांमधील 5 तासांची बैठक संपन्न, मुंबईतही सर्व 227 प्रभागांवर चर्चा

राज्यात महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून विविध जिल्हा, शहरांमध्ये युतीचे समीकरण जुळून येताना पाहायला मिळत आहे.
Marathon Meetings for Mahayuti Formula : महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्मूला ठरला; शिंदे – चव्हाणांमधील 5 तासांची बैठक संपन्न, मुंबईतही सर्व 227 प्रभागांवर चर्चा

मुंबई : राज्यात महापालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून विविध जिल्हा, शहरांमध्ये युतीचे समीकरण जुळून येताना पाहायला मिळत आहे. पालिका काबिज करण्यासाठी पक्ष एकमेकांशी हातमिळवणी करत आहे. त्यातच महायुतीच्या जागावाटपाचाही तिढा सुटला असून चित्र स्पष्ट झालं आहे. मंगळवारी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात 5 तास मॅरेथॉन चर्चा पार पडली. ही बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होती. यावेळी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, सरचिटणीस राहुल शेवाळे हेदेखील उपस्थित होते. 

हेही वाचा : Shivsena – MNS Alliance: अखेर जमलं! शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला; आज दुपारी मोठी घोषणा

दरम्यान, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) महापालिकांमधील शिवसेना-भाजप युती अंतिम टप्प्यात आली असून येथील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे समजते.येत्या दोन दिवसांत स्थानिक पातळीवर प्रभागस्तरावरील उमेदवारांची चर्चा होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. युतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा लवकरच होणार असून जागावाटपाचे आकडेही समोर येतील. 

तसेच मुंबईतही बैठकांचे सत्र सुरू असून वांद्रे येथील रंगशारदा येथे रात्री उशिरापर्यंत भाजप व शिवसेना जागावाटपावरती खलबतं झाल्याचे समजते. उद्योग मंत्री उदय सामंत, राहुल शेवाळे, भाजपचे मंत्री आशिष शेलार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सर्व 227 प्रभागांवरती सकारात्मक चर्चा झाली असून आज रात्रीपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न मिटणार असल्याचे समजते. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version