‘मी राज्यपाल आणि मविआचा प्रवक्ता नाही’ – चंद्रकांत पाटील

‘मी राज्यपाल आणि मविआचा प्रवक्ता नाही’ – चंद्रकांत पाटील

राज्यपाल आणि महाविकास आघाडीमधील संघर्षाबाबत बोलायला मी दोघांचाही प्रवक्त नाही, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीवर सद्या प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. यावर भाष्य करताना राज्यपाल आणि मविआमधल्या संघर्षाबाबत मी कसं बोलणार? असा चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच राष्ट्रपती राजवटीसाठी राज्यपालांनी अहवाल लिहायचा असतो, यावर मी काही बोलणार नाही, असेही ते म्हणाले.

काल विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेना नेत्यांनी केली होती. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेचा प्रश्न मनमानी नाही तर काय? असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे. तर सभागृहात गदारोळ केल्याचा आरोप करत सरकारने त्यांच्या मनानुसार १२ आमदारांना निलंबित केले आहे. परंतु याप्रकरणाचे कोणतेही पुरावे नसताना त्यांना निलंबित केले असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून मविआत कुरघोडीचे राजकारण

विधानपरिषद अध्यक्षपद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदावरील काँग्रेस नेते नाना पटोले यांना हटवले आहे. त्यामुळे नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षीय पदाच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसकडून पुन्हा अध्यक्षपदाचा आग्रह करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version