येत्या रविवारी सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील कल्याणचा 100 वर्षे जुना पत्री पूल पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी रविवारचा रेल्वे प्रवास कटकटीचा आणि त्रासाचा ठरणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे.
सुमारे लोकलच्या 140 फेऱ्या रद्द होणार असून, 40 मेल एक्स्प्रेसच्या वेळापत्रकांवर याचा परिणाम होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.