‘मला आईची करुणा मिळाल्याने कोरोना दूर राहिला’ – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

‘मला आईची करुणा मिळाल्याने कोरोना दूर राहिला’ – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

राजभवनात नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज सकाळी झाले. यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, ‘राजभवन केवळ राजकीय वस्तू नाही तर लोकांसाठी असावे.’

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनातील ऐतिहासिक भुयारात क्रांतिकारक स्मृती जपणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच दरबार हॉलचे नामकरण समर्थ हॉल करून, संतांच्या भूमीत या वास्तूला संताचे नाव असावे, अशी मागणीही राज्यपाल कोश्यारी यांनी केली आहे.

राजभवनाच्या परिसराचे वैशिष्ट्य सांगताना राज्यपाल म्हणाले, मलबार हिल तिन्ही बाजूंनी समुद्र आहे. तर अनके वर्षांपासून बाण गंगादेखील वास करते. यावर सिद्धिविनायक आणि मुंबा देवीची कृपा आहे. मी अडीच वर्षांपासून येथे आहे, तसेच राजभवन केवळ राजकीय वस्तू नाही तर लोकांसाठी असावे, असेही ते म्हणाले.

कोरोनाकाळात आम्ही विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव वाढवण्यासाठी आम्ही काम केले. तर राजभवनातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर केल्या आहेत. तसेच मी तब्बल ५ हजार लोकांचा मी गौरव केला आहे. माझ्या आईने मला खूप करुणा दिली आहे, त्यामुळे मला कोरोनाची भीती नाही, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version