CNG Price Hike : सीएनजी दरात वाढ! मुंबई, ठाणे आणि MMR मध्ये आजपासून दरवाढ लागू; ऑटो-रिक्षांची भाडेवाढ होणार?

मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. 
CNG Price Hike : सीएनजी दरात वाढ! मुंबई, ठाणे आणि MMR मध्ये आजपासून दरवाढ लागू; ऑटो-रिक्षांची भाडेवाढ होणार?

मुंबई : संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. यामपळे प्रवासी आणि वाहतूक व्यावसायिकांवरील खर्चात वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) किरकोळ सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांनी वाढ केली असून, आजपासून नवीन दर 84 रुपये प्रति किलो झाला आहे. ही सुधारित किंमत मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर एमएमआर भागांमध्ये लागू आहे. यापूर्वी सीएनजीचा दर 82 रुपये प्रति किलो होता. वाढत्या उत्पादन खर्चाला आणि सध्याच्या बाजारपेठेतील परिस्थितीला या दरवाढीचे कारण मानले जात आहे.

हेही वाचा : India Bans Sugar Exports : भारतातील साखर निर्यातीवर बंदी; साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्यण

सीएनजी दरात वाढ झाल्यानंतर लगेचच, ऑटो-रिक्षा संघटनांनी भाडेवाढीसाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. ऑटो संघटनांच्या मते, इंधनाच्या किमतीतील सततच्या वाढीमुळे चालकांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होत होतो. ज्यामुळे सध्याच्या भाड्यावर वाहने चालवणे अधिकाधिक कठीण होत आहे. संघटनांनी ऑटो-रिक्षाच्या मूळ भाड्यात किमान 1 रुपयाची वाढ करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने त्यांच्या मागणीवर तातडीने कारवाई करावी, असे आवाहन केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version