Ganpati Visarjan Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनाच्या दिवशी धावणार लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या; विरार ते चर्चगेट पाहा वेळापत्रक

आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

Ganpati Visarjan Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनाच्या दिवशी धावणार लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या; विरार ते चर्चगेट पाहा वेळापत्रक
Ganpati Visarjan Mumbai Local

आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी मुंबईत विविध ठिकाणी भव्य मिरवणुका निघणार आहेत. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याने शहरातील रस्त्यांसह रेल्वे स्थानकांवरही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यादरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

गणेश विसर्जनाच्या दिवशी पश्चिम रेल्वेकडून 84 लोकल फेऱ्यांचा पूर्वनियोजित चर्नी रोड थांबा रद्द करण्यात आला आहे. तर 37 जलद लोकल सर्व स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. तसेच रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांसाठी 12 धीम्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी हा मोठा निर्णय घेतला असून, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गर्दीचे व्यवस्थापन आणि अतिरिक्त प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन रेल्वे सेवांमध्ये विशेष नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा- Pune Ganpati Visarjan : पुणेकरांसाठी मोठी बातमी! बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी 41 तास धावणार पुणे मेट्रो; 6 स्थानकांवर बदलले नियम

त्यामुळे गणेशभक्तांना विसर्जनासाठी प्रवास करताना मोठी मदत मिळणार असून, गर्दीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. यावेळी गणपती विसर्जनाला गिरगाव चौपाटीवर जाणाऱ्या भाविकांसाठी चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट दरम्यान प्रत्येकी सहा लोकल फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.

यात विरार ते चर्चगेट मध्यरात्री 12.15, 12.30, 1.10, 1.30, 2 आणि 3 वाजता एकूण 6 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तर चर्चगेट ते विरार मध्यरात्री 1.15, 1.45, 2.15, 2.55, 3.15 आणि 3.45 वाजता अशा फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तर गणेश विसर्जनाच्या दिवशी फलाट क्रमांक 2 आणि 3 वर होणारी संभाव्य गर्दी कमी करण्यासाठी सायंकाळी 6 ते रात्री 11.30 या कालावधीत चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या 84 अप धीम्या लोकल चर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर थांबणार नाहीत. तसेच सायंकाळी 5 ते रात्री 8.30 या काळात मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या 37 जलद 12 डब्यांच्या लोकल धीम्या लोकलप्रमाणे धावतील.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number