सध्या अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात शाळेत-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमधील जेवण अथवा नाश्ता केल्यामुळे त्यांना विषबाधा झाली आहे. शाळा आणि कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये अनेकदा गैरवर्तन पाहायला मिळत. तेथील अन्न बनवताना त्यात स्वच्छता नसणे आणि हलगर्जीपणा पहायला मिलतो. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईतील घाटकोपर येथील शाळेतून समोर आला आहे.
घाटकोपर पश्चिमेमधील एका शाळेत काल सकाळच्या वेळेस शाळेतील कॅन्टीनमधून 15 ते 20 विद्यार्थ्यांनी समोसा खाल्ला होता. त्यानंतर अवघ्या काही वेळाने विद्यार्थ्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांची तब्येत तपासण्यासाठी तत्काळ महानगरपालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांना बोलावले तर काही पालकांनी आपल्या मुलांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार विषबाधा झालेले हे विद्यार्थी इयत्ता पाचवी ते आठवतील असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबद धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे, जेवण बनवणाऱ्यांच्याकडून चुकून तेलात कापूर पडला. समोसा करताना कोणत्याही शिळ्या भाजीचा वापर झालेला नाही तर समोसा करताना जे तेल वापरले त्यामध्ये देवासमोर ठेवलेला कापूर त्या तेलात पडला होता. त्यामुळे कापू पोटात गेल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. अशी माहिती शाळेच्या प्राचार्या यांनी दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिकेने असं सांगितले की, त्यांनाही समोसा खाताना कापराचा वास आला होता. त्यानंतर त्यांनी कॅन्टीनमध्ये जाऊन कोणालाही समोसा न देण्याचे आदेश दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार सर्व विद्यार्थ्यांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.