Gold- Silver Rates: सोनं महागलं नाही, चांदीही स्थिर! गणेशोत्सवात सराफा बाजारात खरेदीचा उत्साह; नेमके दर किती?

Jalgaon Gold- Silver Rate
Jalgaon Gold- Silver Rate

जळगाव : सोने आणि चांदीच्या दरातील चढ-उतारामुळे चिंतेत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांना सप्टेंबर महिन्यात काहीसा दिलासा मिळाला आहे. महिनाभर सोने आणि चांदीच्या दरात तुलनेने स्थिरता पाहायला मिळाल्याने ग्राहकांनी पुन्हा खरेदीकडे मोर्चा वळवला आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या वस्तूंच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

गेल्या महिन्यात सोने आणि चांदीच्या दरांनी मोठी उसळी घेतली होती. त्यामुळे ग्राहकांमध्ये दर आणखी वाढण्याची चिंता निर्माण झाली होती. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात काही प्रमाणात घसरण झाली आणि त्यानंतर दर तुलनेने स्थिर राहिले. त्यामुळे सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

TRAI Recharge Rules: सर्वसामान्य ग्राहकांसाठी TRAI चा मोठा दिलासा; टेलिकॉम कंपन्यांना डेटा-विरहित परवडणारे मासिक प्लॅन्स आणणे अनिवार्य

सध्या जळगावमध्ये जीएसटी वगळता सोन्याचा दर सुमारे 1 लाख 52 हजार रुपये, तर चांदीचा दर सुमारे 2 लाख 38  हजार रुपये असल्याची माहिती सराफा बाजारातून मिळत आहे. दर स्थिर असल्याने ग्राहकांना खरेदीचे नियोजन करणे काहीसे सोपे झाले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात चांदीच्या गणपतीच्या मूर्ती, पूजेच्या वस्तू, ताट, वाट्या, पंचपात्र तसेच इतर धार्मिक वस्तूंची मागणी वाढते. यंदाही चांदीच्या दरात मोठी वाढ न झाल्याने या वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. गणपती बाप्पासाठी चांदीची वस्तू घेण्याला अनेक कुटुंबांमध्ये विशेष महत्त्व दिले जाते.

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी मोठी सोय! 7/12 उतारा WhatsApp वर कसा मिळवायचा? जाणून घ्या 3 सोप्या स्टेप्स

दरम्यान, सोने-चांदीच्या दरांवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनेक घटकांचा परिणाम होत असतो. डॉलर इंडेक्समधील हालचाली, आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची स्थिती आणि व्याजदर यांसारख्या घटकांमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीवर परिणाम होतो. सध्या या घटकांमध्ये परस्परविरोधी परिस्थिती असल्याने दरांमध्ये मोठी हालचाल न होता स्थिरता दिसून येत असल्याचे बाजारातील जाणकारांचे मत आहे.

मात्र, आगामी काळात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थिर दराचा फायदा घेत ग्राहक खरेदी करताना दिसत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत वाढलेली चांदीच्या वस्तूंची मागणी याचाच संकेत मानली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version