आता जि.प.च्या शिक्षकांना गणवेष.. तो ही ब्लेझर!

आता जि.प.च्या शिक्षकांना गणवेष.. तो ही ब्लेझर!

सोलापूर जिल्हा परिषद शाळांतील 10 हजार शिक्षकांना ब्लेझर घालणं बंधनकारक केलंय. तसं परिपत्रकही नुकतंच प्रशासनाकडून काढण्यात आलंय. दिवाळीच्या सुटीनंतर 19 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र या निर्णयाला शिक्षकांनी विरोध दर्शवला आहे

जिल्हा परिषेदच्या प्रशासनाने जो ब्लेझरचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे ग्रामीण भागात अडचण निर्माण होणार आहे. ग्रामीण भागात उन्हाळाचे तीव्रता जास्त असल्याने अशा अवस्थेत शिक्षकांनी ब्लेझर घातल्यास त्यांना त्रास होणार आहे. तसंच शिक्षकांच्या मानसिकतेवरही परिणाम होईल. अशा अवस्थेत विद्यार्थांना कसं शिकवणार अशा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केलाय.

जिल्ह्यातील 50 टक्के शिक्षकांना शुगर आणि बीपीचा त्रास आहे. त्यामुळे शिक्षकांनी जर ब्लेझर घातला तर शिक्षकांमध्ये बेचैनी निर्माण होईल, असं महिला शिक्षकांना वाटतं. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार 10 हजार शिक्षकांनी 19 नोव्हेंबर पासून ब्लेझर घालण्याचा निर्णय प्रशासनाने केला असून यामध्ये  ब्लेझर आणि ब्लेझरवर जिल्हा परिषदेचा लोगो लावण्यात येणार आहे.

शिक्षकांचा गणवेश संदर्भात सर्व शिक्षकांनी गाव पातळीवर ठराव करून निर्णय घ्यायचा आहे. ड्रेस कोड करण्याचं कारण म्हणजे शिक्षकांची छबी विद्यार्था समोर चांगली दिसावी, असं सांगण्यात येत असलं, तरी गाव पातळीवर शिक्षक राजकारण करत असल्याचंही समोर आलंय.

शिक्षकांना एवढ्या कमी दिवसांत ब्लेझरचे कापड उपलब्ध होऊन ते शिंप्याकडून शिवून मिळेल का याबाबत शंका व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा निर्णय अडचणीत येण्याची शक्यता आहे . 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version