पिवळ्या साडीतील महिलेला ‘बिग बॉस’मध्ये जाण्याची इच्छा

पिवळ्या साडीतील महिलेला ‘बिग बॉस’मध्ये जाण्याची इच्छा

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लखनऊ येथील मतदान केंद्रावरील एका देखण्या महिलेची चर्चा सुरु होती. ती महिला पीडब्ल्यूडी खात्यातील अधिकारी असून तिचे नाव रीना द्विवेदी आहे. मतदान केंद्राबाहेर त्यांचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे रीना यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली असून ती टिकवून ठेवण्यासाठी त्यांना बिग बॉसच्या घरात जायचे असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

नक्की प्रकार काय ?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पिवळ्या साडीतील महिलेला बिग बॉस या रिएॅलटी शोमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

संधी मिळाली तर पुढच्या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात जाण्याची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

बिग बॉसचे घर माझ्यासाठी मोठी संधी असेल. तसेच मला माझ्या कुटुंबाचा पाठिंबा असल्याचेही म्हटलं आहे.

पिवळ्या साडीतील महिलेचे नाव रीना द्विेवेदी असून त्या पीडब्लूडी विभागात कनिष्ठ सहाय्यक आहेत.

पाचव्या टप्प्यातील मतदानावेळी त्यांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.

तसेच त्यांच्यानंतर निळ्या रंगातील ड्रेस परिधान केलेल्या महिलेचा फोटो व्हायरल झाला होता.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version