एसी लोकलची 2 वर्षात 40 कोटींची कमाई

एसी लोकलची 2 वर्षात 40 कोटींची कमाई

पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवेला बुधवारी 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 2 वर्षांच्या कालावधीत एसी रेल्वेतून 95 लाख 81 प्रवाशांनी प्रवास केला आहे.

या 2 वर्षांच्या कालावधीत एसी लोकलच्या माध्यमातून 40 कोटींची कमाई झाली आहे. त्यामुळे एसी लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलच्या दररोज एकूण 12 फेऱ्या होतात.

ही एसी लोकल चर्चगेट-विरारस्थानकादरम्यान धावते. एसी लोकल सप्टेंबर महिन्यापासून शनिवार-रविवार या दिवशीही धावत आहे.

त्यामुळे प्रवाशांचा या दिवसातही भरभरुन प्रतिसाद मिळत आहे, असे स्पष्टीकरण पश्चिम रेल्वेकडून दिले आहे.

पश्चिम मार्गावरील एसी लोकलला 25 डिसेंबर 2017 पासून सरुवात झाली होती.

दरम्यान लवकरच पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेवरही एसी लोकल धावणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version