Devendra Fadanvis : “आम्ही शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार” दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी लातूरमध्ये केली मोठी घोषणा

लातूरमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
लातूरमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि पावसाच्या अभावी धोक्यात आलेली खरीप हंगामी पिके, या गंभीर समस्येची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान लातूर जिल्ह्यातील जाऊ गावात सकाळी 11 च्या सुमारास त्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पिकांची आणि परिस्थितीची पाहणी केली.

पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या या बिकट परिस्थितीमध्ये शासनाकडून तातडीने मदत व दिलासा मिळावा, यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना व नुकसानभरपाईचे पंचनामे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच स्थानिक शेतकऱ्यांनी “साहेब, माझ्याजवळ आता काहीच उरलं नाही… लै नुकसान झालंय, काहीतरी करा…” अशा शब्दात आपल्या व्यथा मांडल्या.

Vidyanand Bapat : पुणे पदवीधर निवडणुकीत ‘बापट फॅक्टर’ची चर्चा! विद्यानंद बापट आता निवडणुकीच्या रिंगणात? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

इतकचं नव्हे तर एक शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला. हे सर्व पाहता मुख्यमंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला छातीशी कवटाळलं. मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत लवकरच मोठी मदत जाहीर करण्याची ग्वाही दिली. “काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार” असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात भयंकर दुष्काळाची स्थिती आहे. गेल्या दीड महिन्यापासून पाऊसच कोसळला नसल्याने पिकं करपून गेली आहेत. त्यामुळे पाण्यासह जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. अशातच शेतकऱ्यांची कर्जमाफी सुरू आहे. ती बंद करणार नाही. त्यासाठी अतिरिक्त निधी गोळा करत आहोत. निधी कमी पडणार नाही. पिण्याचे पाणी, जनावराचा चारा याचं नियोजन केलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version