वरुण धवनला मिळालं सर्वांत सुंदर गिफ्ट…

वरुण धवनला मिळालं सर्वांत सुंदर गिफ्ट…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अभिनेता वरुण धवन सध्या आपल्या आयुष्यातील एक सुंदर टप्पा एन्जॉय करत आहे. नुकताच वरूण धवनच्या कुटुंबात एका नव्या सदस्याने एन्ट्री केली आहे.

वरुण धवन काही दिवसांपूर्वी चाचू बनला आहे, आणि वरुणने या गोष्टीचा आनंद स्पेशल अंदाजात आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

वरुणने आपल्या भाचीसोबतचा पहिला फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबाने परिवार नं-1 थीमचे टि-शर्ट परिधान केले आहे.

या फोटोमध्ये वरुणने चाचू नं-1 थीमचा टी – शर्ट परिधान केला आहे. तसेच यामध्ये डेविड धवन यांनी दादु नं-1 प्रिंटचे टि-शर्ट तर वरुणचा भाऊ रोहितने डॅडी नं 1 आणि वरुणच्या वहिनीने मॉम नं-1 प्रिंटचा टि-शर्ट परिधान केला आहे.

वरुण धवनच्या या फोटोला चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात पंसती दर्शवली आहे. वरुणने आपल्या भाचीबद्दल म्हंटले आहे की हे त्यांच्यासाठी आतापर्यंतचं सर्वांत सुंदर गिफ्ट आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version