गाडी टो करण्याच्या वादावरून, गाडी चालकात आणि पोलिस अधिकाऱ्यात हाणामारी

गाडी टो करण्याच्या वादावरून, गाडी चालकात आणि पोलिस अधिकाऱ्यात हाणामारी

जय महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये दुचाकी टो करण्यावरुन वाहतूक पोलिस आणि दुचाकी चालकामध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जवाहर वसुमल लुल्ला नावाच्या दुचाकी चालकाला मारहाण झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लुल्ला यांनी त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याने लुल्ला यांची दुचाकी टो करण्यास कर्मचाऱ्याला सांगितलं. कर्मचाऱ्याने ही गाडी टो केली. आपली दुचाकी टोईंग कारमधून खाली काढण्याचा प्रयत्न केला. मात्र टो  गाडीच्या चालकाने गाडी सुरु केली. गाडी सुरु झाल्यावर वाहतूक पोलिस दार लावत असतानाच जवाहर मध्ये पडले. गाडी सुरु असताना वाहतूक पोलिस आणि दुचाकी चालकामध्ये बाचाबाची सुरू झाली. लुल्ला यांनी गाडी थांबली आणि वाहतूक पोलिसाने खाली उतरुन जवाहर यांच्या कानशिलात लगावली. लुल्ला यांनीही वाहतूक पोलिसाच्या श्रीमुखात भडकवली आहे.

लुल्ला यांनी आपण समोर असतानाही दुचाकी टो केल्यामुळे जाब विचारल्याचा दावा जवाहर यांनी पोलिस अधिकाऱ्या विरोधात तक्रार केला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version