युक्रेन-रशिया युद्धामुळे हवाई प्रवास महागणार

युक्रेन-रशिया युद्धामुळे हवाई प्रवास महागणार

रशिया-युक्रेन युद्धामुळे येत्या काळात हवाई प्रवास महागणार असल्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी विमान इंधनाच्या किंमती ३.२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यानंतर देशातील एटीएफच्या किंमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

मागील दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एटीएफच्या किंमतीत झालेली पाचवी वाढ आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी सांगितले की, राष्ट्रीय राजधानीत एटीएफची किंमत ३.२ टक्क्यांनी वाढून ९३,५३० रुपये प्रति किलोलीटर झाली आहे.

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत मंगळवारी प्रति बॅरल यूएस डॉलर १४७ वर पोहोचली, तेव्हा ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर होते. तेल कंपन्या दर १५ दिवसांना हवाई इंधनाच्या किमतींचा आढावा घेतात. येत्या १५ मार्च रोजी आढावा घेण्यात येणार असून हवाई इंधनाच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version