Ahilya Nagar Police : मॉकड्रिलदरम्यान मोठा अपघात! हातातच ग्रेनेड फुटल्याने चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी; दोघांनी गमावली हाताची बोटे

Ahilya Nagar Police : मॉकड्रिलदरम्यान मोठा अपघात! हातातच ग्रेनेड फुटल्याने चार प्रशिक्षणार्थी पोलीस जखमी; दोघांनी गमावली हाताची बोटे

अहिल्यानगर :  अहिल्यानगरमधील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान आज, सोमवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक घटना घडली. जमाव पांगवण्याच्या ‘मॉक ड्रिल’चे प्रात्यक्षिक सुरू असताना एका हँड ग्रेनेडचा थेट जवानाच्या हातातच भीषण स्फोट झाला. या अपघातात चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून दोन पोलिसांनी आपल्या हाताची बोटे यात गमावली. त्या जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंके ही जखमी झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यापैकी दोघांची दुखापत अत्यंत गंभीर असून इतर दोन कर्मचारी किरकोळ जखमी आहेत.

हेही वाचा : Vidhan Parishad Election 2026 : फॉर्म्युला ठरला! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पाहा कुणाला किती जागा ?

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राखीव पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी सांगितले की, हा स्फोट जमाव पांगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘स्मोक हँडग्रेनेड’मुळे (धूर सोडणारा ग्रेनेड) झाला. प्रशिक्षण सुरू असताना या ग्रेनेडची सुरक्षितता पिन (Pin) काढल्यानंतर, संबंधित जवानाकडून चुकून त्याचे लिव्हर सुटले आणि हा अपघाती स्फोट झाला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version