Shrirampur Accident : श्रीरामपूर हादरलं! टेम्पोच्या धडकेत चिमुकलीने गमावला जीव; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा कुटुंबियांचा आरोप

Shrirampur Accident : श्रीरामपूर हादरलं! टेम्पोच्या धडकेत चिमुकलीने गमावला जीव; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा कुटुंबियांचा आरोप

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 3 परिसरात मंगळवारी सकाळी एका टेम्पोने दिलेल्या धडकेत अडीच वर्षांची चिमुकली श्रुती मच्छिंद्र धोत्रे गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर तिला तातडीने श्रीरामपूर येथील झडे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान या चिमुकलीचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करत डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच चिमुकलीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नातेवाईकांना दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मयत चिमुकलीच्या आईच्या तक्रारीवरून टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दोषी डॉक्टरवरही गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने कुटुंबीयांना दिले आहे.

हेही वाचा : Akola Accident: खामगाव-चिखली मार्गावर भीषण अपघात; एसटीच्या धडकेत 6 जखमी, 2 जणांची प्रकृती गंभीर

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version