Weather Update : राज्यात पावसासह गारपिटीचा हाहाकार; ‘या’ जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी

आज महिन्याच्या अखेरीस 31 मार्च रोजी मुंबई, कोकण उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण जाणवत आहे.
Weather Update : राज्यात पावसासह गारपिटीचा हाहाकार; ‘या’ जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने राज्यातील अनेक भागांना अक्षरश: झोडपून काढलं आहे. आज महिन्याच्या अखेरीस 31 मार्च रोजी मुंबई, कोकण उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण जाणवत आहे. अशातच कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि मुंबई, पालघर येथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगरमध्ये अवकाळीचा हा फटका शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळाला आहे. गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब आणि पेरूच्या बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. ज्यामुळे बुलढाणा आणि धुळे जिल्ह्यातही मध्यरात्री झालेल्या वादळाने रब्बी पिकांची नासाडी केली असून, वीज पडून अनेक मुक्या जनावरांचा नाहक बळी गेला आहे.

हेही वाचा- Maharashtra Unseasonal Rain: राज्यावर अवकाळीचे अस्मानी संकट; बळीराजाच्या डोळ्यांत पाणी, द्राक्ष-डाळिंबाच्या बागा भुईसपाट

मराठवाडा, विदर्भसह मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाचे हाय अलर्ट देण्यात आले आहे. तसेच पुणे आणि कोल्हापूर येथे 60 ते 50 किमी सोसाट्याचा वारा वाहण्याचे सांगण्यात आले आहे. राज्याच्या बहुतांश भागात पावसाने आणि विजांच्या कडकडाटाने हाहाकारच उडवला आहे. दरम्यान मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज असेल त्यापैकी 12 जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यांनुसार पुढील काही दिवसही अशाच स्वरूपाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version