रशिया-युक्रेन युद्धादरम्यान १४व्या दिवशीही परिस्थिती कायम आहे. रशियाकडून युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच आहे. या युद्धादरम्यान युक्रेनचे मोठे नुकसान झाले असून अनेक नागरिक मारले गेले आहेत. त्यामुळे रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर आता अमेरिकेने रशियाची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू कले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाच्या गॅस, कच्च्या तेलाच्या आयातींवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. तसेच या निर्बंधामुळे रशियाला मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
युक्रेनच्या चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मोठी चिंत व्यक्त करण्यात येत आहे. चेरनोबिल अणु प्रकल्पाचा चेरनोबिल न्यूक्लियर डेटा सिस्टमशी संपर्क तुटला असल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने दिली आहे. युक्रेनच्या या प्रकल्पात रशियन देखरेखीखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.