क्रूझवरील पार्टीचे आयोजक हे वानखेडेंचे मित्र – नवाब मलिक

क्रूझवरील पार्टीचे आयोजक हे वानखेडेंचे मित्र – नवाब मलिक

  क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून अनेक आरोप केले आहेत. आज मलिकांनी क्रूझ पार्टीबाबत एक खुलासा करत आरोप केला आहे. क्रूझवरील पार्टीचे आयोजन हे फॅशन टीव्हीचे प्रमुख काशिद खान यांनी केले होते. तर काशिद खान यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

  काशिद खान यांनी क्रूझवरील पार्टीचे आयोजन केले. काशिद खान हे समीर वानखेडे यांचे मित्र असल्यामुळे वानखेडेंनी त्यांच्यावर कारवाई केली नाही, असा आरोप नवाब मलिकांनी वानखेडेंवर केला  आहे.

  क्रूझ ड्रग्रजपार्टीप्रकरण हे आयोजकाशी जोडले गेले आहे. आयोजक काशिद खान हे समीर वानखेडे यांचे मित्र आहेत. क्रूझ ड्रग्जप्रकरणी १३ लोकांना लक्ष्य केले आहे. तसेच हा संपूर्ण खेळ पार्टीच्या आयोजकाचा आहे. परंतु या प्रकरणाची चौकशी केली जात नसल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version