बावनकुळेंनी नवनीत राणांची चिंता वाढवली

बावनकुळेंनी नवनीत राणांची चिंता वाढवली

मोदी सरकारला नव वर्ष पूर्ण झाली आहेत. या ९ वर्षातला लेखाजोखा मांडण्यासाठी अमरावतीत सभेचे आयोजन केले गेले. यावेळी सभेला संबोधित करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ साठी संकल्प केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आता गगन भरारी घ्यायची आहे. शिंदे फडणवीस युतीत राज्यात २०० आमदार निवडून आणायचे आहेत. अमरावतीसह ४५ खासदार निवडून आणायचे असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे भाजपासोबत युतीत असलेल्या खासदार नवनीत राणांची चिंता मात्र वाढवली आहे. गेल्यावेळी राणादांपत्यांच्या दहीहंडी कार्यक्रमाला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी कमळाचा खासदार निवडून आणायचा असा अमरावतीत वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता नवनीत राणाची चिंता वाढवली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version