जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत आज सकाळी साडेसात वाजता मुख्य मॅरेथॉनला सुरुवात झाली. जानेवारी महिन्याचा तिसरा रविवार आणि मुंबई मॅरेथॉन हे समीकरण ठरलेलं आहे. सलग अकराव्या वर्षी देखील मुंबई मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रोकॅम इन्टरनॅशनलच्या वतीनं आज टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. या दोन शर्यतींना जोडूनच अर्धमॅरेथॉन, 10 किलोमीटर्स रन, सीनियर सिटिझन्स रन, व्हीलचेअर रन आणि ड्रीम रन अशा पाच शर्यती आहेत.
अर्धमॅरेथॉनची सुरुवात वरळी सीफेसवरच्या वरळी डेअरीसमोरुन झाली. हाफ मॅरेथॉनमध्ये सेना दलाच्या तीन जवानांनी पहिल्या तीन क्रमांकावर विजय मिळवलाय. प्रदीपकुमारसिंग चौधरी विजयी ठरला आहे. तर, शंकरलाल थापा दुस-या तर दीपक कुंभार तिस-या क्रमांकाने विजेता ठरलाय.
महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये संजीवनी जाधव हिने पहिला क्रमांक मिळवलाय तर मोनिका आथरे दुस-या क्रमांकाची विजेती ठरली. देशविदेशातील धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.