ठाणे-दिवादरम्यान नव्या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. दूरदृश्यप्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य रेल्वेच्या ५व्या आणि ६व्या मार्गिकेचे उद्घाटन केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती लावली.
ठाणे-दिवा दरम्यानच्या ५व्या आणि ६व्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले असून आज दोन्ही मार्गिकांच्या अतिरिक्त उपनगरीय सेवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच शिवजयंतीनिमित्त पंतप्रधानांनी प्रवाशांना भेट दिले असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांना संबोधित करताना प्रवाशांचे अभिनंदन केले आहे. तसेच या मार्गिकांमुळे रेल्वेप्रवास जलद होणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मध्य रेल्वेवर ३६ नव्या लोकल रेल्वे सुरू होत असल्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे. यावेळी त्यांनी अहमदाबाद-मुंबई हायस्पीड ट्रेनची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मुंबईतच नाही, तर देशातील इतर राज्यामंध्ये रेल्वेमध्ये जलद गतीची तसेच इतर राज्यातून येणाऱ्या रेल्वे मार्गांमध्येदेखील आधुनिकतेची आवश्यकता आहे. त्यामुळे अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वेची आवश्यकता असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे.
ठाणे-दिवा दरम्यानच्या ५व्या आणि ६व्या नव्या मार्गिकेमुळे लोकल रेल्वेचे अडथळे दूर होणार आहेत. तसेच या नव्या मार्गिकेमुळे चार मोठे फायदे पंतप्रधानांनी सांगितले आहेत. दोन नव्या मार्गिकांमुळे लोकल रेल्वे आणि एक्स्प्रेस रेल्वेसाठी आता वेगळे मार्ग उपलब्ध झाले असून लोकल प्रवाशांना रेल्वेसाठी ताटकळत उभे राहावे लागणार नाही. तसेच मेगाब्लॉकमधून प्रवाशांची सुटका होणार आहे.
ठाणे – दिवादरम्यान नव्या मार्गाचे उदघाटन
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रेल्वे मार्गांचं लोकार्पण
मध्य रेल्वेच्या ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचं उदघाटन
मार्गिकेमुळे प्रवाश्यांना दिलासा
नव्या मार्गामुळे ३६ उपनगरीय रेल्वे गाड्या धावणार
एकूण १९ किलोमीटर लांबीचा मार्ग
१७० मीटर लांबीच्या बोगद्यातून जाणार दुहेरी मार्ग
६२० कोटींचा भव्य प्रकल्प
स्थानकादरम्यान २१ पर्जन्यवाहिन्या
नव्या मार्गात ८ पादचारी पूल
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.