माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं राज्यातील अनेक गणपती मंदिरांमध्ये आणि काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. माघ गणेशोत्सवाच्या निमित्तानं बुधवारी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. माघी गणेश जयंती निमित्त मंदिरं पानाफुलांची सजून निघाली आहे. सर्वत्र आनंदचं वातावरण आहे. ज्यामुळं दैनंदिन वाहतुकीच्या मार्गांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मुंबईतही प्रभादेवी येथे असणाऱ्या श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक भाविक दूरहून आली आहे. येणाऱ्या भक्तांची गर्दी लक्षात घेता इथंही वाहतुकीत काही बदल करण्यात येतील. ज्यामुळं दादर, प्रभावेदी स्थानकांच्या दिशेनं जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. तर, सिद्धीविनायकच्या दिशेनं येणारी वाहतूकही धीम्या गतीनं सुरु असेल. सायंकाळी सदर परिसरात मिरवणूक निघणार असल्यामुळं वाहतुक एकाच मार्गिकेवरून सुरु ठेवली जाऊ शकते.
पुण्यामध्ये माघी गणेश जयंतीची विशेष धूम. त्यामुळं या भागात अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजी मार्गावर असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे भक्तांची पहाटेपासूनच रिघ पाहायला मिळत आहे. त्यामुळं या मार्गावर सकाळी ६ वाजल्यापासून वाहतुक बंद असेल. सदर परिसरातील गर्दी कमी होत नाही, तोवर हे आदेश लागू असतील. ज्यामुळं या वाटेनं जाणाऱ्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. सदर मार्गावर वाहतूक बंद असली तरीही अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस वाहनं, रुग्णवाहिका आणि काही अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या मार्गावरून प्रवास करता येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.