परमबीर सिंह यांचे निलंबन मागे

परमबीर सिंह यांचे निलंबन मागे

परमबीर सिंह यांच्या अनिल देशमुख प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. अनिल देशमुख प्रकरणात चर्चेत आलेले निलंबित पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांचं निलंबन आता शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतलं आहे.

काय होत नेमकं प्रकरण?
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. यामुळे महाविकास आघाडी अडचणीत आली होती. परमबीर यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांना त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. ठाणे आणि नवी मुंबईतील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात खंडणी वसूल करणे आणि अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये रमबीर सिंह यांना पोलीस दलातून निलंबितही करण्यात आले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version