एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे महामंडळाकडून कठोर कारवाईची भूमीका घेण्यात आली आहे. संपावर असलेल्या ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने निलंबित केले आहे. यामध्ये राज्यातील ४५ आगारांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिकच तीव्र झाला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा मंत्रालयावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज मंत्रालयासमोर आंदोलन करण्यासाठी एसटी कर्मचारी मुंबईत दाखल झाले. यावेळी गोपीचंद पडळकर आणि किरिट सोमय्या हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांचा मोर्चा मंत्रालयाकडे जात असताना गोपीचंद पडळकर आणि किरीय सोमय्या यांना पोलिसांनी अटक करण्यात आली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनला भाजप नेत्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि गोपिचंद पडळकर यांनी एसटी संपकाऱ्याना पाठिंबा दिला. त्यामुळे गोपीचंद पडळकर आणि किरिट सोमय्या आंदोलनत सहभागी झाले असून मंत्रालयाकडे जाताना त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.