वृत्तसंस्था, मुंबई
बॉलिवूडची हवाहवाई जग सोडून गेल्याची बातमी संपूर्ण सिनेसृष्टीला सदमा देऊन गेली. कुटुंबियांसह लग्नसोहळ्यासाठी दुबईला गेलेल्या श्रीदेवींचे पार्थिव अखेर मायदेशी परतण्यास रवाना झाले आहे. श्रीदेवींच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हादरून गेली, हे देखील तितकेच खरे. पण त्यांच्या मृत्यूमुळे अनेक शंकांना तोंड आले. अनेक शंका-कुशंकांचं वादळ उठलं.
श्रीदेवींच्या मृत्यूमागचं गूढ काय याची उत्सुकता सगळ्यांना वाटू लागली. दरम्यान चौकशीसाठी पती बोनी कपूर यांना दुबईतच थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. श्रीदेवींनी मद्यपान केले होते का? त्या तणावाखाली होत्या का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न उभे राहिले होते. अखेर या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे. तीन दिवसांपासून दुबईत रखडलेले श्रीदेवींचे पार्थिव अखेर मुंबईत येण्यास रवाना झाले आहेत.
मंगळवारी रात्रीपर्यंत श्रीदेवींचे पार्थिव कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे. तसेच, चौकशीच्या घेऱ्यात सापडलेले पती बोनी कपूर यांना दुबई पोलिसांकडून क्लिन चीट देण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.