BMC Election 2026 : महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू युतीला धक्का; उमेदवारी न मिळाल्याने ‘हे’ पदाधिकारी लढणार अपक्ष

अवघ्या 15 दिवसांवर मुंबई महानगरपालिका निवडणूक येईल ठेपली आहे. आज निवडणुसाठी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस होता. 
BMC Election 2026 : महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू युतीला धक्का; उमेदवारी न मिळाल्याने ‘हे’ पदाधिकारी लढणार अपक्ष

मुंबई : अवघ्या 15 दिवसांवर मुंबई महानगरपालिका निवडणूक येईल ठेपली आहे. आज निवडणुसाठी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस होता. ज्या इच्छुकांना पक्षाचा AB फॅार्म मिळाला नाही, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. मुंबईतही ठाकरे बंधूंची यादी जाहीर होताच बंडखोर पदाधिकाऱ्यांनी अपक्ष लढण्याचे निश्चित करत अर्ज दाखल केले आहेत. 

शिवसेना ठाकरे गट 163 जागा, मनसे 53 जागा लढवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकीसाठी युती जाहीर करतानाच उमेदवारांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे AB फॉर्म वाटताना प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी आणि नाराजीनाट्य रंगले असून उद्धव ठाकरेंच्या 7 पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला. तर मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने अपक्ष म्हणून बंडखोरी केली आहे. 

हेही वाचा : BMC Election 2026: मोठी बातमी! ठाणे महापालिकेसाठी मनसेची अधिकृत यादी समोर

बंडखोर उमेदवारांची नावे  –

शिवसेना उद्धव ठाकरे

चंद्रशेखर वायंगणकर – प्रभाग 95 
सागर देवरे – 106
कमलाकर नाईक -169 
सूर्यकांत कोळी – 193
संगीता जगताप – 196 
विजय इंदुलकर – 202 
दिव्या बडवे – 203 

मनसे

अनिशा माझगांवकर – 114

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version