शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आता त्यांच्या मुलीही उतरल्या रस्त्यावर

शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आता त्यांच्या मुलीही उतरल्या रस्त्यावर

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी तसेच मुला-मुलींना विविध शैक्षणिक सवलती मिळाव्या या मागण्यांसाठी आज नाशिक-पुणे राष्ट्रीय

महामार्गावर घारगाव येथे शेतकऱ्यांच्या मुलींनी काही काळ चक्काजाम आंदोलन केलं.

 

भारत हा कृषीप्रधान देश असूनही या देशात शेतकऱ्यांची अतिशय वाईट अवस्था झाली असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त

केली.

आंदोलनाच्या मुख्य समन्वयक आणि संगमनेर काँग्रेसच्या पंचायत समितीच्या सदस्या प्रियंका गडगे यांच्या सह शेकडो महिला आणि

तरुणी या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version