जय महारष्ट्र न्यूज , दिल्ली
महिला कर्मचाऱ्यांच्या संरक्षणेबद्दल नेहमीच प्रश्न उद्भवत असतो. नोकरीच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ महिला मुकाटपणे सहन करतात.
तसेच तक्रार नोंदवायची झाल्यास महिलांना खूप खस्ता खाव्या लागतात. पण आता फक्त एका क्लिक वर ही तक्रार नोंदवता येणार आहे.
केंद्र सरकारने महिलांनां लैंगिक अत्याचाराविरुध्द तक्रार नोंदविण्यासाठी ‘शी-बॉक्स’ ही कार्यप्रणाली तयार केली आहे.
सध्या ही कार्यप्रणाली केवळ केंद्र सरकारच्या महिलांसाठी आहे. पण लवकरच ती खाजगी कार्यालयीन महिलांसाठीदेखील उपलब्ध करण्यात येणार आहे.
सेक्शुअल हॅरॅसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स (SHe-Box) असं या पोर्टलचं नाव आहे. http://www.wcd-sh.nic.in/ या पोर्टलवरून महिलांना तक्रार करता येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.