नाना पटोलेंवर उमेदवार बदलण्याची नामुष्की; डॉ. रविंद्र भोयर बदलून मंगेश देशमुखांना उमेदवारी

नाना पटोलेंवर उमेदवार बदलण्याची नामुष्की; डॉ. रविंद्र भोयर बदलून मंगेश देशमुखांना उमेदवारी

विधान परिषद निवडणुकी तोंडावर असताना प्रदेशाध्यक्ष नाटा पटोले यांच्यावर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. काँग्रेसने डॉ. रविंद्र भोयर यांना बदलून त्यांच्याऐवजी मंगेश देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉ. रवींद्र भोयर यांनी बदलण्याची चर्चा सुरू होती. आणि आज अखेर काँग्रेसने उमेदवार बदलला असून मंगेश देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. यासंबंधी पत्रक काँग्रेसने जाहीर केले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षाकडून डॉ. रविंद्र भोयर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र निवडणुक तोंडावर आली असताना उमेदवार बदलण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशनानुसार अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने सादर केलेल्या पत्रात लिहिले आहे की, नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षातर्फे डॉ. रविंद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी उद्या दिनांक, १० डिसेंबर, २०२१ रोजी मतदान होत आहे. मात्र आता निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. रविंद्र भोयर यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी असमर्थता दर्शविल्याचे समजते, त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेचे तसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशनानुसार या निवडणूकीतील अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना काँग्रेस पक्षातर्फे पाठींबा जाहीर करण्यात येत आहे. तर या निवडणूकीतील मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना यासंदर्भात माहिती देण्यात यावी, असे पत्रकात म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version