‘सिल्व्हर ओकवर उद्धव ठाकरेंचं लोटांगण’

‘सिल्व्हर ओकवर उद्धव ठाकरेंचं लोटांगण’

मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. यावेळी उद्धव आणि पवार यांच्यात दीड तास चर्चा झाली. यावेळी उद्धव गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यादेखील उपस्तित होत्या. मविआतील सत्तासंघर्षानंतर उद्धव आणि पवार यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, या भेटीनंतर शिवसेनेकडून टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा वारसा सोडला आणि लोटांगण घालत सिल्वर ओकला गेले. ठाकरेंचं कंट्रोल सिल्व्हर ओकला आहे, अशी टीका शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीवर शिवसेनेकडून टीका केली जात आहे. मातोश्रीचा इतिहास आहे, कितीही मोठा नेता असला तरी बाळासाहेबांना भेटायला येत होते. पण आज वेदना झाल्या. आज मराठी बाणा, बाळासाहेबांचा वारसा सेडून लोटांगण घालत सिल्व्हर ओकवर गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वेदना झाल्या आहेत, असे शंभुराज देसाई म्हणाले. त्यामुळे सर्व गुंडाळून काका मला वाचवा म्हणायला तर सिल्व्हर ओकवर गेले नाहीत ना?, अशी बोचरी टीका शंभुराज देसाई यांनी उद्धव यांना लगावली आहे.

मविआमध्ये होत असलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यावरून पुढील काळात मविआ टिकेल की नाही हे कळत नसल्याचे देसाई म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओकवर आहे हे कळत होते. उद्धव घराण्याने स्वत:कडे रिमोट कंट्रोल ठेवला पण आता हा रिमोट कंट्रोल सिल्व्हर ओकवर असल्याचे शंभुराज देसाई म्हणाले. त्यामुळे आता काँग्रेस आणि संजय राऊत, उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली असल्याचे देसाई म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version