Saturn Transit 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीदेवाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले जाते. कर्मानुसार फळ देणारा, न्यायप्रिय आणि शिस्तप्रिय ग्रह म्हणून शनीची ओळख आहे. त्यामुळे शनीच्या हालचालींवर अनेक जण बारकाईने लक्ष ठेवतात. विशेष म्हणजे शनी हा अतिशय संथ गतीने भ्रमण करणारा ग्रह असल्याने त्याचा परिणामही दीर्घकाळ टिकतो.
याच पार्श्वभूमीवर 21 मार्च 2026 रोजी शनीच्या स्थितीत एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास शनी उत्तराभाद्रपद नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. सध्या शनी मीन राशीत स्थित असून या नक्षत्र बदलामुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात व्यक्त केली जाते.
विशेष म्हणजे या काळात शनी अस्त अवस्थेत असणार आहे. त्यामुळे त्याच्या परिणामांमध्ये काही सूक्ष्म बदल जाणवू शकतात. काही राशींना यामुळे दिलासा मिळणार असून अडचणी कमी होण्याची शक्यता आहे.
मेष रास:
मेष राशीसाठी हा बदल काही प्रमाणात दिलासा देणारा ठरू शकतो. सध्या साडेसातीचा प्रारंभिक टप्पा सुरू असला तरी, आरोग्याशी संबंधित त्रास कमी होण्याची चिन्हे आहेत. अनेक दिवसांपासून अडकून पडलेली कामे हळूहळू मार्गी लागू शकतात. आर्थिक बाबतीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. काहींना कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे मानसिक तणावात घट होईल.
सिंह रास:
सिंह राशीच्या व्यक्तींना करिअरच्या दृष्टीने सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. कामातील अडथळे कमी होऊन आत्मविश्वास वाढेल. आरोग्याच्या बाबतीतही स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
धनु रास:
धनु राशीसाठी शनिचे हे नक्षत्र परिवर्तन प्रगतीचे दार उघडणारे ठरू शकते. व्यवसायात विस्तार आणि वाढीच्या संधी निर्माण होऊ शकतात. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल मानला जातो. कौशल्यविकासासाठीही हा योग्य काळ ठरू शकतो. केलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता अधिक राहील.
शनिच्या या नक्षत्र बदलामुळे काही राशींना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत असली तरी प्रत्येक व्यक्तीच्या जन्मपत्रिकेनुसार परिणाम वेगळे असू शकतात. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.