संभाजीराजेंनी कळवली मुख्यमंत्र्यांना नाराजी

संभाजीराजेंनी कळवली मुख्यमंत्र्यांना नाराजी

रविवारी १९ फेब्रुवारीला राज्यभरात छत्रपती शिवाजीमहाराजांचा जयंती उत्सव साजरा केला जात आहे. किल्ले शिवनेरीवरही मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने अनेकांना गडावरच थांबवण्यात आल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी गडकिल्ले संवर्धनाच्या मुद्द्यावरूनही सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

किल्ले शिवनेरीवर होणारा महोत्सव हा शासकीय महोत्सव आहे. तरी लोकांना मोठ्या प्रमाणात गडावर सोडण्यात आलं आहे. मीसुद्धा पायी चालत गडावर पोहोचलो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गडावर पोहोचले. मध्यरात्रीपासून लोक गडावर चालत येत आहेत. त्यामुळे मी लोकांबरोबर जाऊन दर्शन घेणार, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी जयंती उत्सवाच्या नियोजनावरूनही नाराजी व्यक्त केली. ‘जर सरकारला शासकीय शिवजयंती साजरी करायची असेल तर करावी, मग अशा परिस्थितीत लोकांना गडावर का सोडता? हा गड लहान आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे लोकांना आधीच सांगा की शासकीय शिवजयंती साजरी होईपर्यंत गडावर चढू नका, आता हजारो लोकं दर्शनासाठी वाट बघत आहेत’, असेही ते म्हणाले. तसेच ‘रायगडावर शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याने तिथे राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्यात आली होती. मग शिवनेरीवर वेगळा नियम का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चालत शिवनेरीवर यावं”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version