Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेसाठी साईंची शिर्डी सज्ज, भक्तांसाठी रात्रभर साईमंदिर खुलं; तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी पूर्ण

Guru Purnima 2026 : गुरुपौर्णिमेसाठी साईंची शिर्डी सज्ज, भक्तांसाठी रात्रभर साईमंदिर खुलं; तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी पूर्ण

जयेश सावंत, प्रतिनिधी 

शिर्डी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमेकरता अनेक भाविक शिर्डीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभरातून अनेक पालख्या साईदर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असतात.  यंदाही गुरूपौर्णिमानिमित्त साईबाबांच्या नामाचा जयघोष करत असंख्य पालख्या पायी शिर्डीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी 28 जुलै ते 30 जुलै या काळात गुरूपौर्णिमा उत्‍सव साजरा होत असून या उत्‍सवात सर्व साईभक्‍तांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.

श्री साईबाबा हयातीत असल्यापासून गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्‍साहात साजरी केली जात आहे. त्‍यामुळे या दिवसाला आजही अनन्‍य साधारण महत्‍व आहे. श्री साईबाबांवर श्रद्धा असणारे लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येऊन समाधीचे दर्शन घेतात. तसेच या उत्‍सवास हजेरी लावतात. यंदाही तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होणार असून सोमवारी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. तर बुधवारी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साईमंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांना दिली.  

हेही वाचा : Mumbai Student Protest : आता मुंबईत विद्यार्थ्यांचा एल्गार! क्रांती दिनाला भव्य रॅलीचे आयोजन; 9 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना एकत्र येणाचे आवाहन

तीन दिवसीय गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त साईभक्तांची व्यवस्था –

१) गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले असणार

२) नोंदणी झालेल्या 45 पालख्या साईनगरीत दाखल होणार

३) पावसाच्या वातावरणामुळे 68 हजार स्केअर फुटाच्या मंडपाची व्यवस्था

४) रेल्वे स्टेशन, बसस्थानक, साईभक्त निवास जवळून साईमंदिरात येण्यासाठी भक्तांसाठी 20 बसेसच्या माध्यमातून मोफत बससेवा 

५) उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी नवीन लाडू विक्री केंद्र

६) साईभक्तांसोबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version