पिंपरी चिंचवड मध्ये चिमुकल्यांची वारी

पिंपरी चिंचवड मध्ये चिमुकल्यांची वारी

आषाढी एकादशी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्या आपल्या अंतिम टप्प्यात पोहचल्या असून देशभरातून लाखोंच्या संख्येने वारकरी या पालखी सोहळ्यासाठी पंढरपूर मध्ये पोहचले आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये देखील पालखीचे प्रस्थान होऊन चिमुकल्यांची पालखी पंढरीत पोहचली आहे.

पायी आषाढी वारी करणे अवघड असले तरी आपल्या चिमुकल्या पावलांनी शाळेजवळच्या परिसरात खांद्यावर पालखी घेऊन या चिमुकल्यांनी पंढरपूरची वारी केल्याचा आनंद लुटला. पालखी दरम्यान गोंडस गोंडस असे विठ्ठल ,रुख्मिणी चे रुप तर विना टाळ घेऊन तुकाराम महाराज त्याच बरोबर माऊली चे नाम जपताना ही चिमुकली दिसली. त्यांचे हे मनमोहक रूप ,आणि आपल्या बोबड्या वानिने हरिनामाचा जप नागरिकांना आपल्या मोबाईल मध्ये टिपण्याचा मोह आवरता आला नाही. घरातून बाहेर येत नागरिकांनी या चिमुकल्यांचा दिंडी सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version