बँकांना हजारो कोटींचा गंडा घालणारे अटकेत

बँकांना हजारो कोटींचा गंडा घालणारे अटकेत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रोटोमॅक पेन कंपनीचा मालक विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल कोठारी या दोघांना अखेर अटक करण्यात आली आहे. देशातील ७ बँकांकडून कर्ज घेऊन त्यांची ३ हजार ७०० कोटींची फसवणूक केल्याचा कोठारी व कुटुंबीयांवर आरोप आहे. याप्रकरणी गेल्या ४ दिवसांपासून कोठारी पिता-पुत्राची सीबीआयकडून कसून चौकशी सुरू होती. या चौकशीतून ठोस पुरावे हाती लागल्यानंतर आज या दोघांनाही अटक करण्यात आली.
रोटोमॅकचा कर्जघोटाळा समोर आल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल करून कोठारीच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. या छाप्यामध्ये कोठारीचं कानपूरमधील घर आणि कार्यालयात छापा टाकून महत्त्वाचे पुरावे सीबीआयने आपल्या हाती घेतले होते. एवढच नव्हे तर कुटुंबीयांचे बँक लॉकर तपासतानाही तपासण्यता आले. कोटक महिंद्रा बँकेतही त्यांच्या खात्या विषयीची चौकशी करण्यात आली होती.

कोठारीने पिता-पुत्रांनी कोणत्या बँकांना ठगवलं?

बँक ऑफ इंडिया – 754 कोटी 77 लाख

बँक ऑफ बडोदा – 456 कोटी 63 लाख

इंडियन ओव्हरसीज बँक – 771 कोटी 07 लाख

युनियन बँक ऑफ इंडिया – 458 कोटी 95 लाख

अलाहाबाद बँक – 330 कोटी 68 लाख

बँक ऑफ महाराष्ट्र – 49 कोटी 82 लाख

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स – 97 कोटी 47 लाख

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version