Rinku Rajguru : ‘आशा’ पुसणार ‘आर्ची’ची इमेज? रिंकू राजगुरूच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

सैराटनंतर रिंकू राजगुरू नव्या रुपात ‘आशा’ चित्रपटातून पुनरागमन करत आहे. आशा सेविकेच्या भूमिकेत तिचा संघर्ष, जिद्द आणि संवेदनशील अभिनय ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दिसतो.
Rinku Rajguru : ‘आशा’ पुसणार ‘आर्ची’ची इमेज? रिंकू राजगुरूच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज

सैराटच्या प्रचंड यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मिळालेलं सर्वात मोठं नाव म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरू. नागराज मंजुळे दिग्दर्शित या सुपरहिट चित्रपटानं केवळ 100 कोटींचा ऐतिहासिक टप्पाच गाठला नाही, तर आर्ची हे पात्र घराघरात पोहोचवलं. सैराटला नऊ वर्षे झाली असली, तरी आजही आर्चीची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनातून पुसली गेलेली नाही. रिंकूचं नाव घेताच सर्वात आधी आर्चीची बिनधास्त, हट्टी आणि प्रेमात वेडी झालेली व्यक्तिरेखा आठवते.

मात्र आता रिंकूच्या नव्या चित्रपटाने म्हणजेच आशाने प्रेक्षकांमध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे. येत्या 19 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत असून त्याचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. अवघ्या 2 मिनिटं 18 सेकंदात रिंकूनं दाखवलेली भावमुद्रा, तिचा आत्मविश्वासपूर्ण आवाज, आणि एक वेगळी धडाडी पाहताच सिनेमाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरचा शेवट जसा भावनिक आहे, तितकाच तो विचार करायला लावणारा देखील आहे.

हेही वाचा: Ambadas Danve On Govt: फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त अंबादास दानवेंचा महायुतीवर निशाणा; ‘अपयशांची यादी’ जाहीर करत केले गंभीर आरोप

बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये ही टॅगलाइन घेऊन आशा हा चित्रपट महिलांच्या संघर्षांना नवं परिमाण देतो. या कथेत रिंकू एका आशा सेविकेची भूमिका साकारत आहे. सायकलवरून गावागावांत फिरत, लोकांच्या आरोग्याची जबाबदारी खांद्यावर घेत ती अनेक संकटांना सामोरी जाते. वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव, समाजातील अन्यायाविरुद्ध उभी राहण्याची ताकद आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची तिची जिद्द हे सगळं ट्रेलरमध्ये प्रभावीपणे उलगडताना दिसतं. आशा हा चित्रपट केवळ एका सेविकेची कथा नसून दररोज आयुष्याशी झगडणाऱ्या हजारो महिलांचा आवाज आहे. त्यांच्या वेदना, त्यांची धडपड आणि न थकणारी लढाई यांचं वास्तववादी चित्रण या सिनेमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

रिंकूच्या अभिनयातील प्रगल्भता आणि संवेदनशीलता प्रेक्षकांना नव्या रूपात दिसणार आहे. या चित्रपटात रिंकू सोबत दिशा दानडे, दिलीप घारे, सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, हर्षा गुप्ते यांच्या भूमिका कथानकाला अधिक बळ देतात. सामाजिक वास्तव, भावनिक दडपण आणि अस्मितेची झुंज या सगळ्यांचा सुंदर संगम आशामध्ये जाणवतो.

रिंकूच्या आशामधील अभिनयाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने हा चित्रपट आणखी विशेष ठरतो. सैराटमधील रिंकू आणि आशातील रिंकू या दोन्ही रुपांमध्ये आज फरक दिसतो. आता प्रश्न एकच रिंकूची आशा आर्चीच्या लोकप्रियतेला मागे टाकणार का? हे उत्तर सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकच देतील. 

हेही वाचा: Noida Cyber Fraud: नोएडातील आतापर्यंतची सर्वात मोठी सायबर फसवणूक उघड; गुंतवणुकीच्या नावाखाली 12 कोटींचा गंडा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version