Ram Navami Wishes 2026 : राम जन्मला गं, सखे राम जन्मला…, रामनवमी या पावन दिनानिमित्त आपल्या प्रियजनांना द्या ‘या’ शुभेच्छा

रामनवमी या पावन दिनानिमित्त तुम्ही देखील तुमच्या प्रियजनांना, मित्रपरिवाराला तसेच नातेवाईकांना या शुभेच्छा नक्की द्या...
Ram Navami Wishes 2026 : राम जन्मला गं, सखे राम जन्मला…, रामनवमी या पावन दिनानिमित्त आपल्या प्रियजनांना द्या ‘या’ शुभेच्छा

यंदा म्हणजेच 2026 मध्ये रामनवमी 26 मार्चला साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतानुसार, चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला अयोध्येत श्रीरामाचा जन्म झाला होता. त्यामुळे तो दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो. भगवान विष्णूंचे सातवे अवतार म्हणून जन्माला आलेले प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव सत्य, धर्म आणि आदर्श जीवनाचे प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मात रामनवमीचा सण अत्यंत उत्साह आणि श्रद्धेने साजरा केला जातो. प्रभू श्रीरामांचा जन्म याच पावन तिथीला झाला अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात रामनवमीचा सण अत्यंत उत्साह आणि श्रद्धेने साजरा केला जातो. प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हंटले जाते. घराघरांत पोहोचलेले रामरायाचे विचार आजही आपल्याला आदर्श जीवनाची दिशा दाखवतात. रामनवमी या पावन दिनानिमित्त तुम्ही देखील तुमच्या प्रियजनांना, मित्रपरिवाराला तसेच नातेवाईकांना या शुभेच्छा नक्की द्या…

सत्य, प्रेम आणि सदाचार
हाच रामाचा खरा विचार
राम नवमीच्या मंगल क्षणी
करा आनंदाचा स्वीकार
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

अयोध्येत उमटले मंगल स्वर
दुमदुमला परिसर चराचर
राम नामाच्या या प्रकाशात 
मिळो सुख तुम्हाला निरंतर
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

मर्यादा पुरुषोत्तम राम आहे
पवित्र त्याचे धाम आहे
ज्याच्या मुखात रामाचे नाव
त्याला मिळालेले फळही महान आहे
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

अयोध्येचा राजा तो, सीतेचा पती
भक्तांच्या ह्रदयात ज्याची महती
रामनवमीच्या या शुभदिनी
उजळू दे तुमच्या आयुष्याची ज्योती
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

 ज्याने तारले दगड पाण्यावर 
त्याची कृपा सदैव आपल्यावर 
रामनवमीच्या पवित्री दिनी 
रममान होऊ राम नामाच्या तालावर
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version