स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित

स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित

मावळच्या तळेगाव एमआयडीसी येथील भामा आसखेड आणि आंध्र धरणातुन पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी तळेगाव एमआयडीसी येथे पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र एमआयडीसी मधील स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवून पिंपरी चिंचवडला पाणी दिले जात आहे. त्याच्या निषेधार्थ स्थानिक शेतकऱ्यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसताच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून तळेगाव एमआयडीसी पोलिसांची मदत घेऊन पोलीस बंदोबस्त ठेवत काम सुरू करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून ही पाईपलाईन जात आहे त्यांच्या जमीनीचा परतावा न देता ही कामे सुरू आहेत.जोपर्यंत एमआयडीसी मधील शेतकऱ्यांना जमिनीचा परतावा मिळत नाही.तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या जात नाही तोपर्यंत पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाइपलाइनचे काम होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.तर भविष्यात मावळातील पवना जलवाहिनी सारखे मोठे आंदोलन करून काम बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version