भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी खळबळजनक ट्विट केले आहे. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी लवकरच चौकशी होणार असून या दोघांची हत्या झाल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे. शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांना उद्देशून हे ट्विट करण्यात आले. तसेच मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार करण्यात आली असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.
नारायण राणे यांनी ट्विट केले की, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी. लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल, एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले, असे त्यांनी ट्विट केले. तसेच विनायक राऊत हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार? असा सवालही नारायण राणे यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.
खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी
लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. — Narayan Rane (@MeNarayanRane) February 18, 2022
विनायक राऊतांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांच्यवार सडकून टीका केली होती. ते म्हणाले, ‘नारायण राणे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी करून काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याशी गद्दारी करून ते भाजपमध्ये गेले. उद्या ते भाजपशीही बेईमानी करून दुसऱ्या पक्षात जातील’, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.