जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्ववादी यांची भन्नाट जोडी पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतेय. Whats up लग्न या चित्रपटाच्या माध्यमातून या जोडीची केमिस्ट्री आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केलय. या आधी त्यांनी नटसम्राट या चित्रपटाची निर्मिती केली होती. दिग्दर्शकाच्या भूमिकेत ते पहिल्यांदाच दिसणार आहेत.
या चित्रपटात विक्रम गोखले ,वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, स्नेहा रायकर, अश्विनी कुलकर्णी आणि विनी जगताप अशी तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. 16 मार्चला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.